श्री गुरु तेज बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष सभा संपन्न

ग्रामपंचायत नाचणे तर्फे Guru Tegh Bahadur यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात गुरुजींच्या महान बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि ऐक्याचा संदेश दिला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. 🙏