प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट

पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्लास्टिक बंदी

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्लास्टिक बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आपल्या परिसरात दिसत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर, आपल्या परिसरातील गोळा केलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया केली जाईल आणि त्याचा पर्यावरणपूरक वापर सुनिश्चित केला जाईल.

ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, पान्नपट्टी, हातगाडी व इतर व्यावसायिक ठिकाणी जर प्लास्टिकसदृश्य बाबी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये दंडात्मक कारवाईसह रोख स्वरूपात दंड वसूल केला जाईल आणि आवश्यक असल्यास व्यवसाय बंद करण्याबाबतही आदेश दिले जातील.

हा प्रकल्प गावात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा पाऊल ठरेल. प्रत्येक ग्रामस्थाने प्लास्टिक वापर कमी करून या युनिटच्या उद्देशात सहकार्य करणे गरजेचे आहे. यामुळे न्नाचणे ग्रामपंचायत परिसर अधिक स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त बनेल.